नवी दिल्ली - कोरोना आणि टाळेबंदीचा फटका खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांना बसत आहे. वुईवर्क इंडियाच्या २० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. ही कंपनी एकाच ठिकाणी विविध कंपन्यांना काम करण्यासाठी कार्यालय उपलब्ध करून देते.
कोरोनाच्या महामारीचा परिणाम आणि जगभरातील व्यवसायामधून कमी झालेला महसूल या कारणांनी वुईवर्क कंपनी अडचणीत सापडली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण वीरवानी यांनी, व्यवसायातील रणनीतीमध्ये मुलभूत बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले. कंपनीच्या इमारतींमधून जास्त किंमत मिळविणे आणि खर्च कमी करणे हे पहिले उद्दिष्ट असल्याचे वीरवानी यांनी सांगितले.
हेही वाचा-केंद्र सरकारने पुन्हा सुधारित आर्थिक पॅकेज घोषित करावे- काँग्रेसची मागणी