मुंबई- प्राईम इंडिया अपेक्षेहून चांगली कामगिरी करत असल्याचे अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी म्हटले आहे. त्यामुळे स्ट्रीमिंग सेवा असलेल्या अॅमेझॉन प्राईममध्ये दुप्पट गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. ते मुंबईमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
जेफ बेझोस यांनी बॉलीवूडमधील सुपरस्टार शाहरूख खान आणि दिग्दर्शक झोया अख्तर यांची भेट घेवून संवाद साधला. जेफ यांची ही मुंबईतील पहिलीच भेट आहे. प्राईम व्हिडिओला जगात सर्वाधिक भारतात प्रतिसाद मिळत असल्याचे बेझोस यांनी शाहरूख व झोया यांच्याशी बोलताना सांगितले.
पुढे ते म्हणाले, जगात सर्वात मोठे पुस्तकांचे ऑनलाईन दुकान सुरू करण्यासाठी अॅमेझॉनची १९९४ मध्ये सुरुवात केली. पुस्तके परवडणाऱ्या दरात मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, एवढा प्रचंड व्यवसाय होईल, असे वाटले नव्हते. यावेळी खास भारतीयांसाठी असलेले प्राईम व्हिडिओचे ७ शो लाँच केले.
हेही वाचा-पियूष गोयल यांच्या वक्तव्यानंतर अॅमेझॉनने 'ही' केली घोषणा