महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

देशांतर्गत विमान प्रवासावर 'विस्तारा'कडून ऑफर; ४८ तासात करावी लागणार बुकिंग - domestic network reservations

विस्तारा कंपनीकडून इकॉनॉमी, प्रिमियम इकॉनॉमी आणि बिझनेस अशा सर्व श्रेणीतील तिकिटांवर सवलती देण्यात येणार आहेत. या सवलत योजनेंतर्गत ग्राहक १० ऑक्टोबर ते पुढील वर्षाच्या २८ मार्चपर्यंतच्या प्रवासाची तिकिटाचे आरक्षण करू शकणार आहेत.

संग्रहित -विस्तारा विमान सेवा

By

Published : Oct 9, 2019, 8:16 PM IST

नवी दिल्ली - सणाच्या तोंडावर विस्तारा विमान कंपनीने ग्राहकांसाठी सेल जाहीर केला आहे. सर्व प्रकारच्या विमान तिकिटांवर आज मध्यरात्रापासून ४८ तासांपर्यंत कंपनीकडून सवलत देण्यात येणार आहे.

विस्तारा कंपनीकडून इकॉनॉमी, प्रिमियम इकॉनॉमी आणि बिझनेस अशा सर्व श्रेणीतील तिकिटांवर सवलती देण्यात येणार आहेत. या सवलत योजनेंतर्गत ग्राहक हे १० ऑक्टोबर ते पुढील वर्षाच्या २८ मार्चपर्यंतच्या प्रवासाची तिकिटाचे आरक्षण करू शकणार आहेत.

हेही वाचा-कांदे दरवाढीनंतर ग्राहकांना पुन्हा महागाईची झळ; दिल्लीत टोमॅटोचा दर प्रति किलो ८० रुपये!

विशेषत: दिल्ली-मुंबई, मुंबई-बंगळुरू, मुंबई-गोवा, दिल्ली-चेन्नई आणि दिल्ली-मुंबई या विमान मार्गावर प्रवाशांना बुकिंगसाठी सवलत देण्यात येणार आहे. विस्ताराचे मुख्य वाणिज्य अधिकारी संजीव कपूर म्हणाले, आम्ही खूपवेळा सवलती देत नाही. हा सेल म्हणजे आमच्या ग्राहकांसमवेत सण साजरा करण्याचा मार्ग आहे.

हेही वाचा-जिओच्या ग्राहकांना पहिल्यांदाच कॉलिंगकरिता मोजावे लागणार पैसे; 'हा' आहे नवा दर

ABOUT THE AUTHOR

...view details