मुंबई -सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिपक कोचर व व्हिडिओकॉन ग्रुपचे प्रमोटर वेणुगोपाल धूत यांची रविवारी मध्यरात्रीपर्यंत चौकशी केली. दिपक हे आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे.
ईडीने शनिवारी आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांना समन्स बजावले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणी संशय असल्यावरून ईडीने दीपक कोचर व वेणुगोपाल धूत यांची चौकशी केली. व्हिडिओकॉनला कर्ज मिळण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या चेअरमन चंदा कोचर यांनी आर्थिक अनियमितता केल्याचा ईडीला संशय आहे.कोचर आणि त्यांचे पती ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी रविवारी रात्री ११ वाजता पोहोचले. तर धूत हे रात्री २ वाजता कार्यालयात पोहोचले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर कोचर या अर्ध्या तासात कार्यालयातून बाहेर पडल्याचे समजते. मात्र, कोचर आणि धूत यांची ईडीकडून चौकशी सुरुच राहिली. त्यांनी दिलेल्या प्रश्नांची ईडीकडून नोंद करण्यात आली. यावेळी ईडीने जप्त केलेली कागदपत्रे धूत व कोचर यांच्यासमोर ठेवली होती.
असा आहे घटनाक्रम-शुक्रवारी ईडीने चंदा कोचर आणि वेणुगोपाल धूत यांच्या मालमत्तेजवळील परिसरात मुंबई आणि औरंगाबादमध्ये शोध घेतला. ईडीने पीएमएलए कायद्यानुसार मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. २२ फेब्रुवारीला सीबीआयने चंदा, त्यांचे पती दीपक आणि धूत यांना लूकआऊट नोटीस बजाविली होती. एफआर नोंदविल्यानंतर ही नोटीस बजाविण्यात आली होती. अशी नोटीस आर्थिक गुन्ह्याबाबतीत नोंदविणे बंधनकारक असल्याचे ईडीतील अधिकाऱ्याने सांगितले.
काय आहे आरोपभ्रष्टाचार करून;चंदा कोचर यांनीव्हिडिकॉन ग्रुपला ३ हजार २५० कोटींचे कर्ज मंजूर केल्याचे ईडीने आरोपत्रात म्हटले आहे.