महाराष्ट्र

maharashtra

वंदे भारत एक्सप्रेस : नवी दिल्ली ते मुंबईसह नव्या तीन मार्गावर धावणार

By

Published : Jun 4, 2019, 12:54 PM IST

वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी डिसेंबअखेर काम पूर्ण होईल, यासाठी रेल्वे मंत्रालय नियोजन करत आहे.

वंदे भारत एक्सप्रेस

नवी दिल्ली- केंद्र सरकारने दिल्ली-वाराणसी मार्गावर देशातील सर्वात वेगवान 'वंदे भारत एक्सप्रेस' रेल्वे सुरू केली आहे. ही रेल्वे देशात इतर तीन मार्गावरही सुरू होणार आहे. सूत्राच्या माहितीनुसार नवी दिल्ली ते हावडा, नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल आणि नवी दिल्ली ते जम्मू अशा मार्गावर ही रेल्वे सुरू होणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी डिसेंबअखेर काम पूर्ण होईल, यासाठी रेल्वे मंत्रालय नियोजन करत आहे.

वंदे भारत एक्सप्रेस देशातील पहिली स्वयंचलित रेल्वे-

चेन्नईमधील इंटिग्रेट कोच उत्पादन प्रकल्पात ६० हजार बोगींची निर्मिती करण्यात आली आहे. आयसीएफ (इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी) भविष्यात ४० ' वंदे भारत एक्सप्रेस' ची निर्मिती करणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य अग्रवाल यांनी मे महिन्यात दिली होती. वंदे भारत एक्सप्रेस देशातील पहिली स्वयंचलित रेल्वे आहे. या रेल्वेचे पूर्वी 'ट्रेन १८' असे नाव होते. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी लातूरमध्ये रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे यंदा लातूर जिल्ह्यातील रेल्वेच्या उत्पादन प्रकल्पात वंदे भारत एक्सप्रेसच्या बोगीची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details