वॉशिंग्टन - अमेरिकेचे प्रतिनिधी पुढील आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. हे प्रतिनिधी व्यापारी करार अंतिम टप्प्यात आणण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून भारतात येणार आहेत.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल हे अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी १२ नोव्हेंबरला अमेरिकेचे वाणिज्यमंत्री रॉबर्ट लिथिझर यांच्याबरोबर चर्चा केली आहे. गोयल यांनी १४ नोव्हेंबरला न्यूयॉर्कमधील उच्चस्तरीय उद्योग आणि व्यवसायांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. दोन्ही देशांच्या वाणिज्य मंत्र्यांनी विविध विषयावर सहमती दर्शविली आहे. भारत-अमेरिकेमधील व्यापाराबाबतची बोलणी खूप सकारात्मक झालेली आहे. यामध्ये रखडलेल्या अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे.
हेही वाचा-भारतीय कंपन्यांमध्ये व्होडाफोन आयडियाला तिमाहीत सर्वाधिक तोटा