नवी दिल्ली - अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धाने देशातील चामडे उद्योगाला निर्यातीसाठी प्रचंड संधी असल्याचे सीएलईचे चेअरमन पी. आर. अकील अहमद यांनी सांगितले. या क्षेत्राचा गेल्या चार महिन्यात सात टक्के वृद्धीदर झाल्याचेही त्यांनी सांगितले. ते नॅशनल एक्सपोर्ट एक्सेलन्स अॅवार्ड कार्यक्रमात बोलत होते.
चामडे निर्यात ही केवळ किमतीतच नव्हेतर संख्येनेही वाढत असल्याचे सीएलईचे चेअरमन पी. आर. अकील अहमद यांनी सांगितले. या क्षेत्रामधून महिलांना मोठा रोजगार मिळत आहे. निर्यात वाढीसाठी काही पावले उचलली आहेत. कामगारकेंद्रित असलेल्या या उद्योगात विदेशी चलन आणण्याची मोठी क्षमता आहे. तसेच तरुणांना रोजगार मिळू शकतो, असेही त्यांनी सांगितले.