नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढताना ऑक्सिजन पुरवठ्याला चालना मिळण्याकरता केंद्र सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने लस, ऑक्सिजन आणि इतर संबंधित उपकरणांवरी मुलभूत सीमा शुल्क आणि आरोग्य उपकर आजपासून माफ केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज कोरोना लस, ऑक्सिजन आणि इतर संबंधित उपकरणांवरील मुलभूत सीमा शुल्क आणि आरोग्य उपकर हा आजपासून तीन महिन्यांसाठी माफ केला आहे. त्यामुळे लशीसह ही आरोग्याची उपकरणे, ऑक्सिजनच्या किमती मुबलक उपलब्ध होऊन किमती कमी होणार असल्याची सरकारला अपेक्षा आहे. रुग्णालयासह घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांना त्वरित ऑक्सिजन मिळण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित व्यक्त केली आहे. त्यासाठी सर्व मंत्रालय आणि विभागांनी एका उर्जेने काम करावे, असे पंतप्रधानांनी निर्देश दिले आहेत.
हेही वाचा-अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयचा छापा; सीबीआयने नेमके काय सील केले?