महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Union Budget 2022 : डिजिटल विद्यापीठाची स्थापना करणार, तर 'पीएम-ई-विद्या' कार्यक्रम अतंर्गत 200 टीव्ही चॅनल वाढवणार - केंद्रीय अर्थसंकल्प 2022

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या 2022-23 अर्थसंल्पात कर, रेल्वे, आरोग्य, पायाभूत सुविधा, कृषी, उद्योग, क्रीडा आणि इतरही क्षेत्रात भरीव तरतूद करण्यात आली आहे.

Union Budget 2022-23
Union Budget 2022-23

By

Published : Feb 1, 2022, 11:49 AM IST

Updated : Feb 1, 2022, 12:42 PM IST

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या 2022-23 अर्थसंल्पात कर, रेल्वे, आरोग्य, पायाभूत सुविधा, कृषी, उद्योग, क्रीडा आणि इतरही क्षेत्रात भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच याशिवाय शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद करण्यात आली असून नवीन घोषणा करण्यात आल्या आहेत.

  • PM E - VIDYA अंतर्गत 'एक वर्ग, एक टीव्ही चॅनल' कार्यक्रम 12 वरून 200 टीव्ही चॅनेलवर वाढवला जाईल. हे सर्व राज्यांना इयत्ता 1 ते 12 पर्यंत प्रादेशिक भाषांमध्ये पूरक शिक्षण प्रदान करण्यास सक्षम करेल.
  • स्थानिक भाषांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रोत्साहन देणार
  • पीएम-ई-विद्या कार्यक्रमाचा विस्तार करणार
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात डिजिटल विद्यापीठाची घोषणा केली आहे, त्या म्हणाल्या की, कोरोनाच्या काळात शिक्षणाचे खूप नुकसान झाले आहे.
  • डिजिटल विद्यापीठांची निर्मिती करण्यात येणार असून शाळांमधील प्रत्येक वर्गात टीव्ही लावण्यात येणार आहे. स्किल इंडिया मिशनच्या माध्यमातून आणि सरकारी योजनांतर्गत कुशल कामगार तयार करण्यासाठी युवाशक्ती बनविण्याचे काम केलं जाईल. लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन वाढवण्यासाठी सरकारी प्रकल्पांची संख्या वाढवण्यात येणार आहे"
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात काही सुधारणा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. नैसर्गिक, झिरो बजेट शेती, सेंद्रिय शेती, आधुनिक शेती यांच्या गरजेनुसार कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
Last Updated : Feb 1, 2022, 12:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details