लंडन- पंजाब नॅशनल बँकेची सुमारे २०० अब्ज कोटींची फसवणूक आणि मनीलाँड्रिग गुन्ह्यातील फरार आरोपी नीरव मोदीच्या अर्जावर आज लंडन न्यायालय निकाल देणार आहे. याबाबतचा निकाल सकाळी दहा वाजता येणार आहे.
नीरव मोदीच्या जामिन अर्जावर लंडन न्यायालय आज देणार निकाल
मोदीच्या वकिलांच्या पथकाने वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयात सलग तीनवेळा जामिन मंजूर करण्याच्या निर्णयाविरोधात उच्च याचिका दाखल केली होती.
इंग्लंडचे उच्च न्यायालय 'रॉयल कोर्टस ऑफ जस्टिस'मध्ये मंगळवारी मोदीच्या याचिकेवरील पूर्ण सुनावणी झाली आहे. मोदीच्या वकिलांच्या पथकाने वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयात सलग तीनवेळा जामिन देण्याच्या निर्णयाविरोधात उच्च याचिका दाखल केली होती. मोदीचे वकील बॅ. क्लेयर मोंटगोमरी म्हणाले, भारत सरकारने दावा केलेल्या गुन्ह्यातील ते आरोपी नाहीत. खूप वर्षांपासून नीरव मोदी हे हिरे डिझाईनर आहेत. त्यांना प्रामाणिक आणि विश्वासू मानले जाते, असा त्यांनी दावही केला.
मोदीला लंडन पोलिसांनी १९ मार्चला मेट्रो बँकेतून अटक केली होती. तेव्हा मोदी हा बँकेत नवे खाते काढण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हापासून नीरव मोदी हा तुरुंगात आहे.