महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

महामारीने बेरोजगारीत वाढ : उबेरच्या ३ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा

उबेरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दारा खुरसोवशाही यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून मनुष्यबळात कपात करणार असल्याचे लिहिले आहे. कंपनीने महिन्याच्या सुरुवातीलाच ३ हजार ७०० नोकऱ्यांमध्ये कपात करणार असल्याचे म्हटले आहे.

उबेर
उबेर

By

Published : May 19, 2020, 9:54 AM IST

सॅनफ्रान्सिस्को- कोरोना महामारीमुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी कपात सुरू झाली आहे. उबेर कंपनीने आणखी ३ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संकटात कंपनीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

उबेरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दारा खुरसोवशाही यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून मनुष्यबळात कपात करणार असल्याचे लिहिले आहे. कंपनीने महिन्याच्या सुरुवातीलाच ३ हजार ७०० नोकऱ्यांमध्ये कपात करणार असल्याचे म्हटले आहे. उबेरने सॅनफ्रान्सिस्कोमध्ये २५ टक्के कर्मचारी कमी केले आहेत. उबेरची जगभरातील ४५ कार्यालये बंद करण्यात येत आहेत. यामध्ये सॅनफ्रान्सिस्कोमधील पायर ७० कार्यालय आहे. यामध्ये स्वयंचलित कारसारखी नाविन्यपूर्ण करण्यात येत होते.

हेही वाचा-दिलासादायक पॅकेज दिले नाही तर... वाहतूकदारांच्या संघटनेने 'हा' दिला इशारा

मनुष्यबळात कपात आणि कार्यालय बंद केल्याने दरवर्षी १ अब्ज डॉलर वाचू शकणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या संकटात दुसरी जमेची बाजू म्हणजे उबेर इट्सहा कंपनीसाठी महत्त्वाचा स्त्रोत ठरला आहे. मात्र, येत्या काही महिन्यांत खूप चांगली प्रगतीच्या संधी दिसत नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-देशामध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी मंदी येणार - गोल्डमन सॅच्सचा अंदाज

ABOUT THE AUTHOR

...view details