अबुधाबी- जगभरात कोरोनाचे निदान कमीत कमी वेळेत करण्यासाठी संशोधन सुरू आहे. याबाबत संयुक्त अरब अमिरातीने दिलासादायक संशोधन केले आहे. येथील क्वांटलेझ इमेजिंग लॅबने काही सेकंदात कोरोनाचे निदान देणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
क्वांटलेझ इमेजिंग लॅबने स्क्रीनिंगमधून काही सेकंदात निदान देणार तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे मोठ्या समुहाचे स्क्रीनिंग करून कोरोनाची चाचणी करता येणार आहे. लॅबमधील संशोधक गटाचे प्रमुख डॉ. प्रमोद कुमार यांनी कोरोनाची बाधा झालेल्या पेशींच्या रचनेचा अभ्यास करण्यात येत असल्याचे सांगितले.