नवी दिल्ली -ट्विटर 10 हजारांहून अधिक असलेल्या फॉलोअर्स असलेल्या वापरकर्त्यांसाठी सुपर फॉलो फिचर लाँच करणार आहे. या फिचरमुळे वापरकर्त्यांना अतिरिक्त ट्विट, समुदायात सहभागी होणे व न्यूजलेटरचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
ट्विटरने पॅट्रेऑनसारखी सेवा महसूल मिळविण्यासाठी लाँच करण्याचे नियोजन केले आहे. ट्विटरने ऑनलाईन इव्हेंटमध्ये गुंतवणुकदारांना स्क्रीनशॉट दाखविला आहे. अॅप संशोधक जेन मँनशुन वाँगने नवीन सुपर फॉलो फिचरचा स्क्रीनशॉट लाँच केला आहे. ट्विटरने सुपर फॉलो अॅप्लिकेशनवर काम करत आहे. त्यासाठी कमीत कमी 10 हजार फोलोअर्स, गेल्या 30 दिवसांत 25 दिवसांमध्ये ट्विट करणाऱ्या वापरकर्त्यांना फीचर लागू होणार आहे. ज्या कंटेन्टच्या श्रेणीमध्ये सुपर फॉलोअर्सचे फीचर मिळणार आहे, त्याचीही नावे वाँगने दिली आहेत.
हेही वाचा-प्राप्तिकर विभागाची ई-फायलिंग वेबसाईट होणार आज लाँच; वाचा सविस्तर माहिती