नवी दिल्ली - आर्थिक फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी ट्विटरने मोठा निर्णय घेतला आहे. जर ट्विटरच्या माध्यमाचा वापर आर्थिक फसवणुकीसाठी केला तर संबंधित व्यक्तीचे ट्विटर कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहे.
ट्विटरने आर्थिक घोटाळा प्रतिबंधक धोरण' जाहीर केले आहे. यामध्ये ट्विटरचा वापर वैयक्तिक आर्थिक फसवणुकीचे टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ट्विटर हे लोकसंवादाचे आरोग्यदायी माध्यम करण्याला सर्वप्रथम प्राधान्य असल्याचे ट्विटरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
ऑनलाईन आर्थिक घोटाळे रोखण्यासाठी भारत सरकारच्या प्रयत्नाच्याच दिशेने ट्विटरचे धोरण आखण्यात आल्याचे ट्विटरने म्हटले आहे.