नवी दिल्ली -ट्विटर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिष माहेश्वरी यांनी राजीनामा दिला आहे. ते अमेरिकेत वरिष्ठ पदाची जबाबदारी स्वीकरणार आहेत.
ट्विटरचे रेव्हेन्यू स्ट्रॅटजी (जपान आणि आशिया पॅसिफिक) आणि ऑपरेशन्सचे संचालक यू सॅसामोटो यांनी मनिष माहेश्वरी यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. मनिष माहेश्वरी हे ट्विटरमध्येच आहेत. ते सॅनफ्रान्सिस्कोमध्ये नवीन जबाबदारी स्वीकरणार असल्याचे सॅसामोटो यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-देशांतर्गत विमान प्रवास महाग! केंद्राकडून विमान तिकिट दरात 12.5 टक्क्यांची वाढ
व्हायरल व्हिडिओमुळे अडचणीत सापडले होते मनीष माहेश्वरी-
गाझियाबादच्या लोणीत वयोवृद्धाला मारहाण झालेल्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांना नोटीस बजावली होती. समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप माहेश्वरी यांच्यावर होता. नोटीसमध्ये त्यांना व्यक्तिगत रुपात हजेरी लावण्याचे सांगितले होते. माहेश्वरी हे कर्नाटकातील रहिवासी असून त्यांना कामाच्या व्यापामुळे उत्तर प्रदेशाच्या गाझियाबादला जाणे शक्य नाही. यावर माहेश्वरी यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात दाद मागतली होती. टि्वटर शेअर झालेल्या व्हिडिओचा आणि त्यांचा काही संबंध नसून आपण फक्त एक कर्मचारी असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले होते. त्यावर ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. मनीष माहेश्वरी यांना उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद पोलीस स्थानकात हजेरी लावण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. ही नोटीस शुक्रवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने रद्दबातल केली. प्रत्यक्षात उपस्थित राहण्याची गरज नसून व्हर्चुअल कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाने गाझियाबाद पोलिसांना दिले.
हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाँच केले राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपेज धोरण, 'हे' होणार फायदे