वॉशिंग्टन - अॅपल कंपनी चीनमधून भारतात उत्पादन प्रकल्प हलविण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलला अतिरिक्त कर लावण्याचा इशारा दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत चीनमधून बाहेर पडणाऱ्या अमेरिकन कंपन्यांबाबत मत व्यक्त केले. ते म्हणाले, की चीनमधून अमेरिकन कंपन्यांनी अमेरिकेत परतण्यासाठी करात सवलत देण्यात आलेली आहे. अॅपलने १०० टक्के उत्पादने अमेरिकेत तयारी करावीत, असे ट्रम्प यांनी म्हटले. त्या मार्गाने काम होवू शकते. अॅपलसाठी आम्ही फार काही करू शकत नाही. त्यांनी आमच्यासाठी (मदत) करावी, असे ट्रम्प म्हणाले.