नवी दिल्ली - खनिज तेलाचे दर कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर कमी करावेत, अशी मागणी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने (एआयएमटीसी) सरकारकडे केली आहे. टाळेबंदीत ट्रकचालक समस्येला सामोरे जात असताना टोल वसुली थांबवावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
एआयएमटीसी ही ९५ लाख ट्रक आणि इतर वाहतूक संघटनांचे प्रतिनिधीत्व करते. जागतिक बाजारात पेट्रोल व डिझेलचे दर कमी करून कोणताही दिलासा देण्यात आला नसल्याचे एआयएमटीसीचे अध्यक्ष कुलरतन सिंह अटवाल यांनी म्हटले आहे. सरकारने मे २०१४पासून खनिज तेलाचे दर कमी होताना त्याचा फायदा लोकांना मिळवून दिला आहे. उलट सरकारने उत्पादन शुल्क वाढवून सरकारी तेल कंपन्यांनाचा नफा वाढविला आहे.