महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सीमकार्डला रेंज किती येते? ग्राहकांना दिसणार लाईव्ह मॅप

लाईव्ह मॅपमध्ये २जी, ३जी, ४जी सेवा देणाऱ्या ऑपरेटरचे नेटवर्क हे भौगोलिक क्षेत्राप्रमाणे दिसून येणार आहे.

संपादित

By

Published : Jun 5, 2019, 1:56 PM IST

नवी दिल्ली - तुम्ही राहत्या त्या परिसरात मोबाईल सीमकार्डला रेंज येते का? असा प्रश्न तुम्हाला भेडसावत असेल, तर तुम्ही मोबाईल ऑपरेटरच्या नेटवर्क क्षमतेची ऑनलाईन स्थिती जाणून घेवू शकणार आहात. त्यासाठी ट्राय ग्राहकांना लाईव्ह मॅपची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.


दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) गेल्या वर्षी प्रायोगिकतत्वावर नेटवर्कची माहिती देणारा मॅप दाखविण्यास सुरुवात केली होती. मात्र, या मॅपमध्ये दिल्लीसह दोन नेटवर्कच दाखविण्यात येत आहेत. त्यासाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलेमॅटिक्सबरोबर ट्रायने करार केला आहे. या मॅपमध्ये संपूर्ण भारताचे नेटवर्क दाखविण्याची तयारी ट्रायकडून केली जात आहे. त्यातून कोणत्या क्षेत्रात नेटवर्क नाही, हे कळून येणार आहे. त्यासाठी सर्व मोबाईल ऑपरेटरकडून माहिती घेण्यात येत असल्याचे ट्रायचे चेअरमन आर.एस.शर्मा यांनी सांगितले. येत्या काही आठवड्यात हा मॅप लाईव्ह दिसणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

लाईव्ह मॅपमध्ये २ जी, ३जी, ४जी या सेवा देणाऱ्या ऑपरेटरचे नेटवर्क हे भौगोलिक क्षेत्राप्रमाणे दिसून येणार आहे. मोबाईल ऑपरेटरकडून देण्यात येणाऱ्या सेवेच्या दर्जाची ट्राय काळजापूर्वक पाहणी करत असल्याचे शर्मा यांनी सांगितले. देशातील १०० हून अधिक शहरात स्वतंत्रपणे महामार्ग आणि रेल्वेमार्गावर मोबाईल ऑपरेटरच्या नेटवर्कची चाचणी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details