नवी दिल्ली - ठराविक ग्राहकांना सेवेत प्राधान्य देणारा प्लॅन सुरू ठेवल्याने दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) व्होडाफोन आयडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. व्होडाफोनच्या रेडएक्स टॅरिफमध्ये पारदर्शकतेचा अभाव, दिशाभूल होते. त्यामधून नियामक संस्थेच्या तत्वांचे पालन होत नसल्याचे ट्रायने नोटीसमध्ये म्हटले आहे.
ट्रायने व्होडाफोन आयडियाला ३१ ऑगस्टपर्यंत 'कारणे दाखवा' नोटीसचे उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. नियामक संस्थेच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणात योग्य कारवाई का करू नये, अशी ट्रायने व्होडाफोन आयडियाला विचारणा केली आहे. व्होडाफोन आयडियाने ४ नेटवर्क हे प्राधान्याने आणि वेगवान देण्याचा केलेला दावा हा नियमांचे पालन करत नाही, असे ट्रायने नोटीसमध्ये म्हटले आहे.