नवी दिल्ली - सीबीडीटीचे चेअरमन प्रमोद चंद्रा मोडी यांच्याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मुंबईमधील प्राप्तिकर विभागाच्या (युनिट क्रमांक २) मुख्य आयुक्त अलका त्यागी यांनी तक्रार केली होती. सरकारने त्यागी यांची विशेष सचिवपदी बढती केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून प्रमोद चंद्र मोडी यांच्याबाबत त्यागी यांनी तक्रार केली होती. त्यामध्ये जुनी तपास प्रकरणे काढून ब्लॅकमेल केले जात असल्याचे त्यागी यांनी म्हटले होते. त्यागी यांची प्राप्तिकर विभागाच्या प्रमुख आयुक्तपदी बढती केल्याचे सीबीडीटीने ३ ऑक्टोबरला आदेश काढले आहेत. यापूर्वी त्यांची नागपूरमधील प्रत्यक्ष कर राष्ट्रीय अकादमीच्या प्राचार्यपदी (महासंचालक, प्रशिक्षण) नियुक्ती करण्यात आली होती.