नवी दिल्ली- एनडीए सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातील केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज पदभार स्वीकारला आहे. शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. पारशोत्तम रुपाला आणि कैलाश चौधरी यांनीही केंद्रीय राज्य कृषीमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे.
नरेंद्र सिंह तोमर यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ते म्हणाले, निवडणुकीत दिलेलेल्या आश्वासनाप्रमाणे मोदी सरकारने पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना मंजूर केली आहे. त्यासाठी २ हेक्टरची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे.