नवी दिल्ली - भारत सरकार लवकरच रुपे कार्डची सेवा सौदी अरेबियामध्ये सुरू करणार आहे. याबाबतची घोषणा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जाहीर केली आहे. हज यात्रेकरूंना मदत व्हावी, म्हणून रुपे कार्ड लाँच करण्याच निर्णय घेतल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.
सौदी अरेबियाबरोबर रुपे कार्ड लाँच करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ मोठ्या भारतीय समुदायालाच नव्हे तर हज आणि उमराहच्या यात्रेकरूंनाही फायदा होणार असल्याचे रविश कुमार यांनी सांगितले.