चेन्नई- कोरोनाच्या संकटातही उद्योगाला चालना देण्याकरता तामिळनाडूचे उद्योगमंत्री एम. सी. समपथ यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चीनमधील उद्योगांना तामिळनाडूमध्ये आकर्षित करण्यासाठी तामिळनाडू सरकारने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना तामिळनाडूमध्ये आमंत्रित करण्यासाठी समिती स्थापन केल्याचे उद्योगमंत्री समपथ यांनी स्थानिक माध्यमाला सांगितले. चीनमधील अनेक कंपन्या इतर देशात उद्योग सुरू करण्याच्या विचारात आहेत. तर जपान सरकारने चीनमधून बाहेर पडणाऱ्या जपानी कंपन्यांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे.