महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

टिप्स इंडस्ट्रीजचे संगीत व व्हिडिओ फेसबुकसह इन्स्टाग्रामवर वापरता येणार; दोन्ही कंपन्यांमध्ये करार - Tips music for Instagram story

आमच्यासाठी हे वर्ष खूप मोठे आणि महत्त्वपूर्ण ठरल्याचे टिप्स म्युझिक कंपनीने म्हटले आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर टिप्सचे म्युझिक व व्हिडिओ वापरण्याची परवानगी दिलेली आहे. या करारामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्यांना पोस्ट आणि स्टोरीजसाठी टिप्सचे संगीत वापरता येणार आहे.

फेसबुक
फेसबुक

By

Published : Dec 28, 2020, 3:21 PM IST

नवी दिल्ली- तुम्ही फेसबुक वापरत असाल तर तुमच्यासाठी ही उपयुक्त बातमी आहे. म्युझिक रेकॉर्ड कंपनी टिप्स इंडस्ट्रीजने समाज माध्यम कंपनी फेसबुकबरोबर करार केल्याचे जाहीर केले आहे. या करारामधून टिप्स कंपनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामला संगीत वापरण्याचा परवाना देणार आहे.

आमच्यासाठी हे वर्ष खूप मोठे आणि महत्त्वपूर्ण ठरल्याचे टिप्स म्युझिक कंपनीने म्हटले आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर टिप्सचे म्युझिक व व्हिडिओ वापरण्याची परवानगी दिलेली आहे. या करारामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्यांना पोस्ट आणि स्टोरीजसाठी टिप्सचे संगीत वापरता येणार आहे.

हेही वाचा-आयकेईएला ७२० कोटींचा तोटा; विक्रीत ६४.७ टक्क्यांची वाढ

१९९० मधील लोकप्रिय संगीत फेसबुक व इन्स्टाग्रामसाठी वापरता येणार-

टिप्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक कुमार तौरानी म्हणाले की, फेसबुक आणि टिप्समधील कराराचा जगभरातील लाखो वापरकर्त्यांना फायदा होणार आहे. फेसबुक इंडियाचे संचालक आणि भागीदारी प्रमुख मनीष चोप्रा म्हणाले की, म्युझिक व्हिडिओ अनुभवासाठी इकोसिस्टिम तयार करण्यासाठी आम्ही बांधील आहोता. त्यामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर भावना व्यक्त करण्यासाठी संगीतामुळे वापरकर्त्यांना प्रेरणा मिळते. ९० मधील सुमधूर संगीत घेण्यासाठी आम्ही टिप्स म्युझिकबरोबर संबंध अधिक बळकट करणार आहोत.

हेही वाचा-मिशन रोजगार: उत्तर प्रदेश सरकारचे ५० लाख रोजगार देण्याचे उद्दिष्ट निश्चित

यापूर्वीच सारेगामा इंडियाने फेसबुकबरोबर म्युझिक संगीत परवान्यासाठी करार केला आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना सारेगामा इंडियाचे संगीत व व्हिडिओ वापरता येणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details