नवी दिल्ली - टिंडर या डेटिंग अॅपवरील छळवणुकीचे प्रकार कमी होण्याकरिता कंपनीने बदल केला आहे. यापुढे आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यापूर्वी तुम्हाला खात्री आहे का, (आर यू शुअर) असा प्रश्न किंडर वापरकर्त्याला विचारणार आहे.
टिंडर डेटिंग अॅपवर आर यू शुअर (एवायएस) हे फीचर सुरू झाले आहे. या फीचरमुळे टेस्टिंगमध्ये आक्षेपार्ह मजकुरामध्ये १० टक्के कमी प्रमाण झाले आहे. कृत्रिम मानवी बुद्धिमत्ते वापर करून वापरकर्त्यांना आक्षेपार्ह मजकूर असेल तर इशारा देणारे संदेश पाठविले जाणार आहेत. यापूर्वी ज्या पद्धतीच्या मजकुराला रिपोर्ट करण्यात आले आहे, असे मजकूर पोस्ट होत असताना वापरकर्त्याला इशारा मिळणार आहे. त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा होणार असल्याचे टिंडर कंपनीने म्हटले आहे.