सॅनफ्रान्सिस्को –अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 45 दिवसानंतर टिकटॉकला अमेरिकेत व्यवसाय करण्यासाठी बंदी लागू करणारे कार्यकारी आदेश काढले आहेत. त्यामुळे तिळतापड झालेल्या टिकटॉक कंपनीने थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
कार्यकारी आदेशामुळे धक्का बसल्याचे टिकटॉकने म्हटले. टिकटॉकने ट्रम्प यांच्या आदेशावर प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीने म्हटले, की कार्यकारी आदेशांचा वापर करताना कोणतीही प्रक्रिया करण्यात आलेली नाही. आम्हाला आणि आमच्या वापरकर्त्याला योग्य वागणूक मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जर ते प्रशासनाकडून झाले नाही, तर अमेरिकेच्या न्यायालयाकडून होईल, असे टिकटॉकने म्हटले आहे.