महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

टिक टॉकने चीनला डाटा शेअर करत असल्याचा फेटाळला आरोप - शशी थरुर

काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी लोकसभेत शून्य प्रहरात टिक टॉकबाबत प्रश्न उपस्थित केला होता.  टिक टॉककडून चीन सरकारला डाटा मिळत असल्याचे वृत्त  आले असल्याचे थरुर यांनी म्हटले होते.

टिक टॉक

By

Published : Jul 2, 2019, 7:21 PM IST

नवी दिल्ली - चीनी कंपनी असलेली 'टिक टॉक' कंपनी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी टिक टॉक कंपनी भारतातील डाटा गोळा करून चीनला पाठवत असल्याचा सोमवारी आरोप केला. हा आरोप टिक टॉक कंपनीने फेटाळून लावला.

काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी लोकसभेत शून्य प्रहरात टिक टॉकबाबत प्रश्न उपस्थित केला होता. टिक टॉककडून चीन सरकारला डाटा मिळत असल्याचे वृत्त आले असल्याचे थरुर यांनी म्हटले होते.

मुलांची आकडेवारी बेकायदेशीरपणे गोळा करत असल्याने टिक टॉकला अमेरिकन सरकारने ५.७ दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावला आहे. वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षितता याला प्राधान्य आहे. आम्ही स्थानिक कायदा आणि बाजारपेठेतील नियम पाळत आहोत. ते सर्व दावे खोटे असल्याचे टिक टॉक कंपनीने म्हटले.

टिक टॉकच्या दाव्यानुसार ही कंपनी चीनमध्ये अॅप चालवित नाही. तसेच चीन सरकारला टिक टॉकच्या वापरकर्त्यांचा डाटा घेण्याची सुविधा नाही. तसेच चीनच्या सरकारी दूरसंचार कंपनीबरोबर कोणतीही भागीदारी नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

सर्व भारतीयांचा डाटा अमेरिकेत संग्रहित केला जातो. सिंगापूरमधील तृतीय पक्षाच्या डाटा केंद्रातही डाटा ठेवला जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. टिक टॉकची मालकी बीजिंगमधील बाईटडान्स कंपनीकडे आहे. टिकटॉकचे देशात सुमारे २ कोटी वापरकर्ते आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details