महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

टाळेबंदीने रद्द झालेल्या विमान तिकिटांचे प्रवाशांना पूर्ण पैसे मिळणार - विमान तिकिट बुकिंग

देशात पहिल्या टप्प्यात २५ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान टाळेबदी करण्यात आली. त्यानंतर ही टाळेबंदी वाढवून ३ मेपर्यंत करण्यात आली. या दरम्यान देशातील आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Apr 16, 2020, 7:29 PM IST

नवी दिल्ली - टाळेबंदीदरम्यान सर्व विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. या तिकीटांचे प्रवाशांना पैसे परत मिळणार असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आज स्पष्ट केले आहे. तिकिट रद्द झाल्यामुळे प्रवाशांना कोणताही दंड न आकारता विमान कंपन्यांकडून पूर्ण पैसे दिले जाणार आहेत.

तिकिट रद्द होवूनही विमान कंपन्या पैसे परत देत नसल्याच्या तक्रारी समाज माध्यमातून प्रवाशांनी केल्या होत्या. देशात पहिल्या टप्प्यात २५ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान टाळांबदी करण्यात आली. त्यानंतर ही टाळाबंदी वाढवून ३ मेपर्यंत करण्यात आली. या टाळाबंदीदरम्यान देशातील आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

हेही वाचा-कोरोनाशी लढा; इंडसइंड बँक करणार ३० कोटींची मदत

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अध्यादेशानुसार विमान कंपन्यांना तिकिट रद्द झालेले पैसे तीन आठवड्यामध्ये प्रवाशांना परत द्यावे लागणार आहेत.

हेही वाचा-ई-कॉमर्स कंपन्या २० एप्रिलपासून करणार मोबाईलसह लॅपटॉपची विक्री

ABOUT THE AUTHOR

...view details