सिडनी - इंटरनेटची गती अधिकाधिक वाढविण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आरएमआयटी विद्यापीठातील संशोधकाने एका सेकदांत १ हजार एचडी सिनेमा डाऊनलोड करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामधील इंटरनेटची गती ही ४४.२ टेराबिट्स प्रति सेकंद आहे.
जगातील सर्वात वेगवान इंटरनेट हे ऑप्टिकल चिप मिळत असल्याचे ऑस्ट्रेलियातील आरएमआयटी विद्यापीठाचे संशोधकांनी दाखवून दिले आहे. या तंत्रज्ञानामधून मेलबर्नमधील १.८ दशलक्ष कुटुंबांना आणि जगभरातील अब्जावधी घरांमध्ये इंटरनेट जोडणी देण्याची क्षमता आहे. कोरोनाचे संकट जगभरात असल्याने अनेकजण घरातून काम करत असताना इंटरनेटची गती वाढण्याचे संशोधन दिलासादायक आहे. कारण इंटरनेटचा वापर वाढल्याने इंटरनेटच्या गतीत अडथळे येत आहेत.