सॅन फ्रान्सिस्को - जर व्हॉट्सअॅप वापरत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. जगभरातील काही जुन्या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅप बंद होणार आहे.
फेसबुकने व्हिडोंज फोनमधील व्हॉट्सअॅप ३१ डिसेंबरपासून बंद होणार असल्याचे म्हटले आहे. येत्या काही महिन्यांत व्हॉट्सअॅप लाखो स्मार्टफोनमधून बंद होणार आहे. व्हॉट्सअॅपकडून काही स्मार्टफोनला दिले जाणारे तांत्रिक सहाय्य थांबविले जाणार आहे. १ फेब्रुवारी २०२० पासून आयफोन आयओएस ८ किंवा त्याहून जुन्या व्हर्जन असल्यास व्हॉट्सअप चालणार नाही. तसेच अँड्राईड डिव्हाईस हे २.३.७ किंवा त्याहून जुने व्हर्जन असल्यास व्हॉट्सअॅप काम करणार नाही.
हेही वाचा-'ही' सुविधा न दिल्यास कंपन्यांना रोज द्यावा लागणार ५ हजारांचा दंड