नवी दिल्ली - रेल्वेची तात्काळ तिकिटे बुकिंग करण्यासाठी चालणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) रेल्वे बुकिंगसाठी वापरण्यात येणारे बेकायदेशीर सॉफ्टवेअर शोधून काढले आहे. याप्रकरणी ६० एजंटला अटक करण्यात आली आहे.
आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार म्हणाले, एजंटांकडून तात्काळ तिकिटे ब्लॉक करण्यात येत होती. सर्वसाधारणपणे २.५५ मिनिटात तात्काळचे तिकिट बुकिंग करता येते. तर बेकायदेशीर सॉफ्टवेअरमुळे १.४८ मिनिटात तात्काळचे तिकिट बुकिंग करता येत होते.
हेही वाचा-'या' कारणांनी चांदीच्या दरात होतेय चढ-उतार; जळगावात प्रति किलो ४७.२०० रुपये