नवी दिल्ली- टाटा ट्रस्टने आरोग्य क्षेत्रातील व्यवसायिकांना कोरोनातील उपचारावर अतिदक्षतेचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी दोन वैद्यकीय संस्थांची मदत टाटा ट्रस्ट घेणार आहे.
क्रिस्टियन मेडिकल कॉलेज (सीएमसी), वेल्लोर आणि केअर इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस (सीआयएचएस), हैदराबाद या दोन संस्था टाटा ग्रुपसाठी ऑनलाईन प्रशिक्षण घेणार आहेत. यामध्ये वैद्यकीय व्यवसायिकांना २२ तासांचे अतिदक्षता उपचाराचे प्रशिक्षण असणार आहे. रुग्णालयांनी निवडलेल्या कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण मिळणार आहे.
हेही वाचा-रिलायन्सकडून २०० शहरांमध्ये जिओमार्टची सेवा लाँच
डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या अतिदक्षतेवरील उपचारासाठी प्रशिक्षणाची गरज लागणार आहे. अतिदक्षतामधील व्यवसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम देण्याचा हेतू आहे. प्रशिक्षणात अतिदक्षतामधील मुलभूत तत्वे आणि पद्धतींचा समावेश आहे. या प्रशिक्षणात विलगीकरण केंद्र व सौम्यलक्षणे असलेल्या रुग्णांचे व्यवस्थापन आदींचा समावेश असणार आहे.
हेही वाचा-सर्वोच्च न्यायालयाने केंद्रासह आरबीआयला पाठविली नोटीस; 'हे' आहे कारण
कोरोनाच्या संकटात टाटा ट्रस्ट सातत्याने मदत करत आहे. नुकतेच टाटा प्रोजेक्ट्सने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांसाठी मदत केली आहे. टाटा ट्रस्टने वैद्यकीय संरक्षण उत्पादने (पीपीई) देवून २६ राज्यांना, केंद्रशासित प्रदेशांना तसेच रुग्णालयांना देवून मदत केली आहे.