रांची - जमशेदपूरमधील टाटा मोटर्सच्या उत्पादन प्रकल्पात वाहन उद्योगातील मंदीचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. येथील वाहन उत्पादन प्रकल्प तिसऱ्यांदा बंद ठेवण्यात येणार आहे.
टाटा मोटर्सचा उत्पादन प्रकल्प १६ ऑगस्टपासून चार दिवस बंद राहणार आहे. प्रत्यक्षात कार्यालयाच्या नियोजनानुसार दोन दिवस प्रकल्प बंद राहणार होता. मात्र तांत्रिक कारणामुळे दोन दिवस वाढविण्यात आल्याचे टाटा मोटर्समधील सूत्राने म्हटले आहे. टाटा मोटर्समधील उत्पादन प्रकल्प हा १ ऑगस्टला एक दिवसासाठी बंद करण्यात आला होता. तर ८ ते १० ऑगस्टदरम्यान तीन दिवसांसाठी बंद करण्यात आला होता. जमशेदपूरच्या उत्पादन प्रकल्पामधून विक्री होणाऱ्या वाहनांची संख्या घटल्याचे सूत्राने सांगितले.