नवी दिल्ली- टाटा-मिस्त्री प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय २ डिसेंबरला अंतिम सुनावणी करणार आहे. एनसीएलएटीने सायरस मिस्त्री यांचे टाटा सन्सचे चेअरमनद पूर्वीप्रमाणे ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला टाटा ग्रुपने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
सायरस मिस्त्री यांच्यातर्फे वरिष्ठ वकील सी. ए. सुंदरम यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. प्रकरण हे अंतिम सुनावणीसाठी डिसेंबरला ठेवूनही ते सातत्याने अर्ज दाखल करत होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी वकील सुंदरम यांना कशामुळे अर्ज दाखल करत आहात, असा प्रश्न केला. त्यावर सुंदरम यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेस काही आणून द्यायचे असल्याचे सांगितले. ते विषय अंतिम सुनावणीत मांडता येणार नाहीत का? तुम्ही उपस्थित केलेले सर्व प्रश्न अंतिम सुनावणीत उपस्थित करणे शक्य असल्याचे सरन्यायाधीशांनी सुंदरम यांना सांगितले.