महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

टाटांचे कौतुकास्पद पाऊल; ऑक्सिजन वाहतुकीकरता २४ क्रायोजेनिक कंटेनर करणार आयात - containers to transport liquid oxygen

टाटा ग्रुपने कोरोनाविरोधात लढण्यासाठी शक्य ते प्रयत्न करण्यासाठी बांधील असल्याचे म्हटले आहे. क्रायोजेनिक कंटेनर चार्टर्ड फ्लाईट्सने देशात आणले जाणार आहेत. त्यामुळे देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे.

Ratan Tata
रतन टाटा

By

Published : Apr 21, 2021, 3:39 PM IST

नवी दिल्ली- देशात ऑक्सिजनची कमतरता भासत असताना टाटा ग्रुपने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. टाटा ग्रुप विदेशातून २४ क्रायोजेनिक कंटेनर आयात करणार आहे. या कंटेनरचा वापर लिक्विड ऑक्सिजन वाहतुकीकरता करण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील ऑक्सिजनच्या कमरतेवर मात करणे शक्य होणार आहे.

टाटा ग्रुपने कंटेनर आयात करण्यात येणार असल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत असताना महामारीत लोकांनी जागे व्हावे, असे म्हटले होते. त्यावर टाटा ग्रुपने कोरोनाविरोधात लढण्यासाठी शक्य ते प्रयत्न करण्यासाठी बांधील असल्याचे म्हटले आहे. क्रायोजेनिक कंटेनर चार्टर्ड फ्लाईट्सने देशात आणले जाणार आहेत. त्यामुळे देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे. टाटा ग्रुपने कंटेनर आयात करण्याच्या निर्णयाचे समाज माध्यमातून मोठे कौतुक होत आहे.

हेही वाचा-प्रत्येकाला लस मिळेल, अशी आशा- रतन टाटा

टाटा देणार २०० ते ३०० टन लिक्विड ऑक्सिजन -

देशात कोविडची दुसरी लाट आली असून मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार झाला आहे. वाढत्या रूग्णसंख्येसह वाढणारा मृत्यूदर आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. देशात अनेक ठिकाणी रेमडेसीवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राची सर्वात वाईट स्थिती आहे. अशा काळात मदत म्हणून टाटा उद्योग समुहाने महाराष्ट्रासह विविध राज्यांना वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजन देण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी एक अधिकृत ट्विट करून टाटा उद्योग समुहाने दिवसाला २०० ते ३०० टन लिक्विड ऑक्सिजन देण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा-कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी धावले पोलाद उद्योजक; करणार हजारो टन ऑक्सिजचा पुरवठा

गतवर्षीही टाटा ग्रुपने कोरोनाच्या लढ्यात केली होती मदत

दरम्यान, कोरोना विरुद्ध लढ्यात सैनिकप्रमाणे लढणाऱ्या आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांसाठी पंचतारांकित हॉटेलचे दरवाजे ताज समूहाने खूले केले होते. कोरोनाचा इलाज करणाऱ्या परिचारिका व डॉक्टर यांना ताज हॉटेल् मध्ये विशेष सुविधा देण्यात आली होती. तसेच टाटा ग्रुपने ५०० कोटी रुपयांहून अधिक कोटी रुपयांची सरकारला कोरोनाच्या लढ्यात मदत केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details