महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मुक्त व्यापाराच्या प्रवाहात कोणतेही अडथळे ठेवायला नको - सुरेश प्रभू - माजी केंद्रीय वाणिज्य मंत्री

दहशतवाद, पायाभूत  कामांची गुणवत्तापूर्ण बांधणी आणि जागतिक आर्थिक स्थिरता या मुद्द्यांना आगामी जी २० परिषदेत प्राधान्य असणार असल्याचे सुरेश प्रभुंनी सांगितले.

सुरेश प्रभू

By

Published : Jun 21, 2019, 8:05 PM IST

नवी दिल्ली - मुक्त व्यापाराच्या प्रवाहात कोणतेही अडथळे ठेवायला नको, असे मत माजी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. ते भारत-अमेरिकेमधील व्यापारी तणावाच्या पार्श्वभूमीवर बोलत होते.


आगामी जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर सुरेश प्रभू यांना विचारले असता त्यांनी जागतिक व्यापारी संस्थेच्या बळकटीकरणाची गरजही व्यक्त केली. पुढे ते म्हणाले, की अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असलेल्या देशापैकी एक देश आहे. या संबंधाचा सर्वात अधिक फायदा अमेरिकेला मिळतो. दोन्ही देशांच्या फायद्यांसाठी हे संबध आणखी वृद्धिगंत होतील, असा आम्हाला विश्वास आहे. दहशतवाद, पायाभूत कामांची गुणवत्तापूर्ण बांधणी आणि जागतिक आर्थिक स्थिरता या मुद्द्यांना आगामी जी २० परिषदेत प्राधान्य असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २७-२८ जूनला जी २० परिषदेत सहभागी होणार आहेत. यावेळी ते जपान, चीन, रशिया आणि अमेरिकेच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details