महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

क्रिप्टोचलनावरील बंदी सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द - digital currencies

आरबीआयच्या परिपत्रकाने आभासी चलनाचे चालणारे कायदेशीर व्यवसाय बंद झाल्याचे आयएमएआयने म्हटले आहे. क्रिप्टोचलन बंद करण्याचे आदेश देण्यापूर्वी आरबीआयने कोणताही अभ्यास केला नसल्याचेही संघटनेने म्हटले आहे.

cryptocurrency
क्रिप्टोचलन

By

Published : Mar 4, 2020, 2:07 PM IST

Updated : Mar 4, 2020, 4:04 PM IST

नवी दिल्ली - क्रिप्टोचलनात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने क्रिप्टोचलनाच्या व्यवहारावरील बंदी उठविली आहे. त्यामुळे बँकांकडून कंपन्यांना क्रिप्टोचलनातील आर्थिक व्यवहार करण्याची परवानगी मिळणार आहे.

इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने (आयएएमएआय) सर्वोच्च न्यायालयात क्रिप्टोचलनासंदर्भात याचिका दाखल केली होती. आयएएमएआयचे सदस्यही क्रिप्टोचलनाचे व्यवहार करतात. या संघटनेच्या सदस्यांना क्रिप्टोचलनाचे व्यवहार करण्यास आरबीआयच्या परिपत्रकानुसार बँकांकडून मनाई करण्यात आली होती.

हेही वाचा-औषधांचा परवडणाऱ्या दरात पुरेसा पुरवठा करा; केंद्राचे राज्यांना निर्देश

आरबीआयच्या परिपत्रकाने आभासी चलनाचे चालणारे कायदेशीर व्यवसाय बंद झाल्याचे आयएमएआयने म्हटले आहे. क्रिप्टोचलन बंद करण्याचे आदेश देण्यापूर्वी आरबीआयने कोणताही अभ्यास केला नसल्याचेही संघटनेने म्हटले आहे. याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने क्रिप्टोचलनावरील बंदी उठविली आहे. क्रिप्टोचलन हे डिजीटल चलन आहे. ते इनक्रिप्टेड तंत्रज्ञानात संग्रहित ठेवले जाते. त्याचा उपयोग ऑनलाईन व्यवहारासाठी करण्यात येतो.

हेही वाचा-शेअर बाजार खुला होताच 102 अंशांनी घसरण

Last Updated : Mar 4, 2020, 4:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details