नवी दिल्ली- गेल्या दोन साखर हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे साखर कारखान्यांनी सुमारे २,४०० कोटी रुपये थकविले आहेत. ही माहिती केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
साखर हंगाम २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये साखरेच्या किमती घसरल्या होत्या. त्यामुळे साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी पैसे देण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात साखर कारखान्यांनी साखर हंगाम २०१८-२०१९ (ऑक्टोबर ते सप्टेंबर) मधील थकित ८४,७०० कोटी रुपये दिले आहेत. तसेच २०१७-१८ मधील थकित ८४,९०० कोटी रुपये दिले आहेत. तर वर्ष २०१८-१९ मधील शेतकऱ्यांचे २,३०० कोटी रुपये साखर कारखान्यांकडे थकित आहेत. तर वर्ष २०१७-१८ मधील १०० कोटी रुपये साखर कारखान्यांकडे थकित आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून पैसे देण्याची प्रक्रिया सतत सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा-कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे टीव्हीएस मोटरच्या उत्पादनावर परिणाम