नवी दिल्ली- अर्थव्यवस्था मंदावली असल्याने रोजगारनिर्मितीवर परिणाम होत आहे. दूरसंचार वाहन उद्योगातीमधील नवीन नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. तर ई-कॉमर्स आणि अन्न तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये नवीन कामगारांना नोकरीत घेण्याचे प्रमाण सातत्याते वाढत आहे.
टीमलीझ कंपनीचे सहसंस्थापक ऋतूपर्णा चक्रवर्ती यांनी विविध क्षेत्रातील नोकर भरतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, सर्वच क्षेत्रातील नोकऱ्या कमी झालेल्या नाहीत. मात्र, वाहन क्षेत्रासह दूरसंचार क्षेत्रावर निश्चितच परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. ते टीमलिझच्या वेबसाईट व अॅपच्या लाँचिग वेळी बोलत होते.