नवी दिल्ली - टाळेबंदीमुळे विविध राज्यांमध्ये मजूर अडकले आहेत. त्यांना काहीअंशी दिलासा देणारा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालया आज घेतला आहे. मजुरांना राज्यांतर्गंत त्यांच्या कामाच्या ठिकाणापर्यंत प्रवास करता येणार आहे. मात्र, त्यासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहे.
टाळेबंदीने अडकलेल्या मजुरांना राज्यांतर्गत प्रवास करता येणार, पण... - केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला
मजुरांना राज्यांबाहेर अथवा केंद्रशासित प्रदेशांबाहेर प्रवास करता येणार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री सचिव अजय भल्ला यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या प्रसारामुळे उद्योग, कृषी, बांधकाम आणि इतर क्षेत्रातील मजूर हे त्यांच्या मूळ गावी केले आहेत.
मजुरांना राज्यांबाहेर अथवा केंद्रशासित प्रदेशांबाहेर प्रवास करता येणार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या प्रसारामुळे उद्योग, कृषी, बांधकाम आणि इतर क्षेत्रातील मजूर हे त्यांच्या मूळ गावी केले आहेत. तर काही मजुरांनी राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या निवारागृहात आश्रय घेतला आहे. अशा मजुरांना कामाच्या केंद्र सरकारने २० एप्रिलपासून कंटेन्टमेंट झोनच्या बाहेर काही उद्योगांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये उत्पादन, बांधकाम, शेती व मनरेगा आदींचा समावेश आहे. अशा कामांच्या ठिकाणी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या मजुरांना स्क्रीनिंग करून कामाच्या ठिकाणी घेवून जाण्यात येणार आहे.
हेही वाचा-आरोग्य विम्याचे दावे दोन तासात निकाली काढा - आयआरडीएआयचे कंपन्यांना आदेश