महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 2, 2022, 1:39 PM IST

ETV Bharat / business

STOCK MARKET UPDATES : सेन्सेक्सने 400 अंकांची उसळी घेतली, तर निफ्टी 17,650 च्या पार

बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने 400 अंकांची उसळी (Sensex jumps 400 points) घेतली आणि निफ्टी 17,650 च्या वर गेला. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक दोन टक्के वाढ पॉवरग्रीडमध्ये झाली.

STOCK MARKET
शेअर बाजार

मुंबई :आर्थिक वर्ष 2022-23 (Economic Year 2022-23) साठी मंगळवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लगेच बुधावारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने 400 अंकांची उसळी घेतली आणि निफ्टीने 17,650 ची पातळी ओलांडली. या दरम्यान 30 शेअर्सवर आधारित निर्देशांक 416.56 अंक किंवा 0.71 टक्क्यांनी वाढून 59,279.13 वर व्यापार करत होता, तर निफ्टी 117.95 अंक किंवा 0.67 टक्क्यांनी वाढून 17,694.80 वर पोहोचला. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक दोन टक्के वाढ पॉवरग्रीडमध्ये झाली.

या व्यतिरिक्त आयटीसी, अ‍ॅक्सिस बँक, कोटक बँक, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक आणि बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्येही वाढ झाली. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला महिंद्रा, टाटा स्टील, अल्ट्रा सिमेंट, एल अँड टी, सन फार्मा आणि विप्रोचे समभाग सुरुवातीच्या व्यवहारात तोट्यात गेले. मागील सत्रात सेन्सेक्स 848.40 अंक म्हणजेच 1.46 टक्के वाढ होऊन 58,862.57 अंकावर बंद झाला होता.

तसेच त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा (National Stock Exchange) निफ्टीही 237 अंकांच्या म्हणजेच 1.37 टक्क्यांच्या वाढीसह 17,576.85 अंकांवर बंद झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी 39.45 लाख कोटी रुपयांचे मोठे बजेट सादर केले. यामध्ये कोरोना महामारीतून सावरण्यासाठी अर्थव्यवस्थेच्या प्रमुख स्तंभांना चालना देण्याच्या उद्देशाने, परवडणाऱ्या घरांच्या समावेशासह महामार्गांवर अधिक भर दिला गेला आहे.

त्याचबरोबर आशियाच्या इतर बाजारात मध्य-व्यापार सौद्यांमध्ये जपानचा निक्केई नफ्यासह व्यवहार करत होता. त्याच वेळी, चीन, हाँगकाँग आणि दक्षिण कोरियासह अनेक आशियाई बाजारपेठ त्यांच्या नवीन वर्षाच्या सुट्टीमुळे बंद आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.19 टक्क्यांनी वाढून $89.33 प्रति बॅरलवर पोहोचले. शेअर बाजाराच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign institutional investors) हे भांडवल बाजारात निव्वळ विक्री करणारे होते. मंगळवारी त्यांनी 21.79 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

ABOUT THE AUTHOR

...view details