मुंबई : एचडीएफसी, इन्फोसिस आणि विप्रो सारख्या कंपन्यांच्या शेअर्सच्या घसरणीमुळे गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांनी घसरला. व्यापाऱ्यांनी सांगितले की, विदेशी निधी बाहेर पडल्याने देशांतर्गत बाजारावर परिणाम झाला आहे. या दरम्यान 30 शेअर्सवर आधारित निर्देशांक सेन्सेक्स 116.47 अंक किंवा 0.20 टक्क्यांनी घसरून 59,441.86 वर व्यवहार करत होता, तर निफ्टी 33.75 अंकांनी किंवा 0.19 टक्क्यांनी घसरून 17,746.25 वर गेला. एचडीएफसी बँकेचा सेन्सेक्समध्ये (HDFC Bank's Sensex) सर्वाधिक 1.10 टक्क्यांनी घसरण झाली. टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, बजाज फायनान्स, एचसीएल टेक आणि कोटक बँक यांचे शेअर्स तोट्यात गेले.
Stock Market Updates: सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 100 पेक्षा अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टी 17,750 पर्यंत खाली आली
आज सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये 100 हून अधिक अंकांनी घसरण (Sensex fell more than 100 points) पाहिला मिळाली. तसेच निफ्टी 17,750 च्या खाली आला. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 1.10 टक्के घसरण एचडीएफसी बँकमध्ये राहिली.
तसेच दुसरीकडे टायटन, एशियन पेंट्स, आयटीसी, मारुती, एसबीआय आणि एनटीपीसी यांनी वाढ नोंदवली. मागील व्यापाराच्या सत्रात सेन्सेक्स 695.76 अंकांच्या म्हणजेच 1.18 टक्क्यांच्या वाढीसह 59,558.33 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे एनएसइ चा निफ्टी 203.15 अंकांच्या किंवा 1.16 टक्क्यांच्या वाढीसह 17,780.00 अंकांच्या पातळीवर बंद झाला. आशियातील इतर बाजारांमध्ये जपानचा निक्की सौद्यांमध्ये तोट्यात होता, तर दक्षिण कोरियाचा बाजार नफ्यात (South Korean market profits) होता.
चीन आणि हाँगकाँगसह अनेक आशियाई बाजारपेठा त्यांच्या नवीन वर्षाच्या सुट्टीमुळे बंद आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.27 टक्क्यांनी घसरून $89.23 प्रति बॅरल होता.शेअर बाजाराच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (Foreign institutional investors) भांडवली बाजारात निव्वळ विक्री करणारे होते. बुधवारी त्यांनी 183.60 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.