महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 31, 2022, 11:16 AM IST

Updated : Jan 31, 2022, 11:38 AM IST

ETV Bharat / business

Stock Market :शेअर बाजारात तेजी; उघडताच 700 पेक्षा जास्त अंकानी चढला सेन्सेक्स

गेल्या दोन आठवड्यांपासून देशांतर्गत शेअर बाजारावर विक्रीचा दबाव (Selling pressure on domestic stock market) आहे. मात्र, हा आठवडा बाजारासाठी चांगला जाण्याची शक्यता आहे. आजपासून संसद 2022 चे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून आज आर्थिक आढावा सादर होणार आहे.

stock market
stock market

मुंबई :अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022 (Budget Session 2022) च्या एक दिवस आधी सेन्सेक्समध्ये तेजी आली आहे. सोमवारी शेअर बाजारात चांगली सुरुवात पाहायला मिळाली. अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022 च्या एक दिवस अगोदर व्यवसायात, प्री-ओपन सत्रातच बाजार 2 टक्क्यांहून अधिक चढला. व्यवसाय उघडल्यानंतर ही बाजाराची मजबूती कायम आहे. आज सादर केल्या जाणाऱ्या आर्थिक समीक्षेतील चांगले आकडे बाजाराचे मनोबल वाढवू शकतो.

देशांतर्गत बाजारात मागील दोन आठवड्या पासून विक्रीचा दबाव कायम आहे. तरी बाजारासाठी हा आठवडा चांगला राहण्याची आशा आहे. आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू (Budget session of Parliament begins) होत असून आज आर्थिक आढावा मांडला जाणार आहे. त्यानंतर मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. बाजाराला अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत. जर सरकार बाजाराच्या अपेक्षेनुसार अर्थसंकल्प सादर केला, तर हा आठवडा चमकदार राहू शकतो.

सुरु आहे तेजी-

सत्र उघडल्यानंतर बाजारात तेजी काही प्रमाणात कमी झाली, परंतु त्यानंतर बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी मध्ये तेजी आहे. सकाळी 09:20 वाजता, सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी चढून 58 हजार अंकांच्या आसपास व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे निफ्टीने 1.25 टक्क्यांनी वधारून 17,300 चा टप्पा ओलांडला पुढे गेला होता.

आशियाई बाजारात संमिश्र कल-

ब्रिटेनची सेंट्रल बँक Bank Of England च्या बोर्डाच्या बैठकी अगोदर पासून आज आशियाई बाजारात संमिश्र कल आहे. बँक ऑफ इंग्लंड (Bank of England) यूएस फेडरल रिझर्व्हचा मार्ग पकडू शकते. अमेरिकेच्या सेंट्रल बँकेने मागील आठवड्यात म्हणले होते की, ते लवकरच व्याज वाढवण्याची सुरुवात करणार आहेत. एनालिस्ट बँक ऑफ इंग्लंडकडून (Analyst Bank of England) असा अंदाज लावला जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सावधानता बाळगत आहेत. आजच्या व्यापारात जपानचा निक्की आणि हाँगकाँगचा हँग सेंग 1.50 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, परंतु चीनचा शांघाय कंपोझिट सुमारे एक टक्क्यांनी खाली आहे. देशांतर्गत बाजारात याचा काही दबाव पाहिला मिळू शकतो.

Last Updated : Jan 31, 2022, 11:38 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details