नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर माजी केंद्रीय वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी टीका केली आहे. कोरोना आणि लॉक डाऊनमुळे अनेकांवर आर्थिक परिणाम झाला आहे. त्यांचा आर्थिक पॅकेजमध्ये समावेश नसल्याची गर्ग यांनी ट्विट केले आहे.
सीतारामन यांनी १.७ लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. यामध्ये गरिबांनी तीन महिन्यांचे धान्य व गॅस सिलिंडर आदींचा समावेश आहे. ज्यांना नोकऱ्या नाहीत, त्यांच्यासाठी आजचे पॅकेज दिलासादायक आहे. मात्र, ८ कोटी लोक असंघटित व्यवसायात आहेत. तर १० कोटी कामगार आहेत. त्या सर्वांना किमान १ लाक लाख कोटी रुपयांची गरज असल्याचे गर्ग यांनी ट्विट केले आहे.
असे आहे आर्थिक पॅकेज
- आरोग्य कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा विमा..
देशातील प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांना पुढील तीन महिन्यांसाठी ५० लाखांचा आरोग्य विमा मिळणार आहे. यामध्ये डॉक्टर्स, पॅरामेडिक स्टाफ, आशा वर्कर्स आणि सॅनिटरी वर्कर्सचाही समावेश आहे. याचा सुमारे २० लाख लोकांना फायदा होईल. आशा आहे, की या तीन महिन्यांमध्ये आपण कोरोनावर मात करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना..
यामध्ये देशातील प्रत्येक नागरिकाला पाच अधिक पाच किलो तांदूळ/गहू मिळणार आहे. तसेच, एक किलो डाळही मिळणार आहे. देशातील सुमारे ८० लाख लोकांना याचा लाभ होणार आहे.
- सरकार भरणार तुमचा ईपीएफ..
पुढील तीन महिन्यांकरता सरकार कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड भरणार आहे. कर्मचाऱ्याचा आणि कंपनीचा दोन्ही वाटा सरकारच भरणार आहे. हे केवळ त्याच कंपन्यांना लागू होणार आहे, ज्या कंपन्यांमध्ये १०० पेक्षा कमी कर्मचारी आहेत, आणि त्यांपैकी ९० टक्के कर्मचाऱ्यांचा पगार १५,००० पेक्षा कमी आहे. देशातील सुमारे पाच कोटी कामगारांना याचा फायदा होणार आहे.
हेही वाचा-लॉकडाऊन: सुनील ग्रोव्हर घराबाहेर पडला, पोलिसांनी केली धुलाई