नवी दिल्ली - गुढीपाडव्यापूर्वी नेहमी गजबजणारी देशातील बहुतांश सोन्याची दुकाने बंद आहेत. कोरोनाचे सावट असल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे.
कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने देशामध्ये चिंताजनक स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि विविध राज्यांनी लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू, मेडिकल दुकाने अशा महत्त्वांच्या कामांसाठी खरेदीसाठीच घराबाहेर पडण्याची परवानगी आहे. दरम्यान, गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानण्यात येतो. त्यामुळे या दिवशी सोन्याची खरेदी करणे हे समृद्धीचे प्रतिक मानण्यात येते. मात्र, यंदा सोन्याचे बंद असलेली दुकाने व कोरोनाची भीती या कारणांनी सोन्याची खरेदी-विक्री ठप्प राहिली आहे.