नवी दिल्ली- आर्थिक संकटात असलेल्या पंजाब आणि महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आश्वस्त केले आहे. पीएमसी प्रकरणाबाबत आरबीआयच्या गव्हर्नरांशी चर्चा केल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ग्राहकांना वाटणाऱ्या चिंतेवर प्राधान्याने काम करणार असल्याचे गव्हर्नर यांनी सांगितल्याची त्यांनी माहिती दिली.
निर्मला सीतारामन यांनी पीएमसीच्या चिंताग्रस्त खातेदारांना आश्वस्त करणारे ट्विट केले आहे.
पीएमसी ग्राहकांचे हित आणि त्यांच्यावर चिंतेवर काम करण्याला सर्वात अधिक प्राधान्य असल्याचे गव्हर्नर यांनी सांगितले. वित्त मंत्रालय हे व्यापकस्तरावर ग्राहकांची चिंता दूर करेल, याची खात्री देते. ग्राहकांना वाटणारी चिंता ही उचित असल्याची आम्हाला समजते.
वित्त मंत्रालयाचा विषय आरबीआयकडे - निर्मला सीतारामन
वित्त मंत्रालय पीएमसीबाबत कदाचित काही करू शकत नाही, नसल्याचे वक्तव्य निर्मला सीतारामन यांनी केले होते. आरबीआय पीएमसीचे प्रकरण पाहत असल्याचेही त्यांनी म्हटले होते.