मुंबई- कोरोना लसीच्या वापराकरता सरकारकडून लवकरच परवानगी मिळण्याच्या शक्यता आहे. अशा स्थितीत लस वाहतुकीकरता स्पाईसजेटने ओम लॉजिस्टिक्सबरोबर केला आहे.
ओम लॉजिस्टिक्सच्या भागीदारीमागे वेगाने आणि अद्वितीय अशी कोरोना लसीची वाहतूक आणि डिलिव्हरी होणे हा उद्देश आहे. तसेच शीत साखळीचे देशात व आंतरराष्ट्रीयस्तरावर शाश्वत जाळे तयार करण्याचा उद्देश असल्याचे स्पाईसजेटने म्हटले आहे. नुकतेच गुरुग्राममधील स्पाईसएक्सप्रेस या विमान कंपनीने उणे ४० ते २५ डिग्री अंश सेल्सियसपर्यंत तापमानात राहणाऱ्या औषध व लसीची वाहतूक करणारी सेवा सुरू केली आहे.
हेही वाचा-सायन रुग्णालयात कोव्हॅक्सिन लसीच्या चाचणीला सुरुवात
अशी असणार भागीदारी-
- ओम लॉजिस्टिक्सचे जगभरात १,२०० कार्यालये आहेत.
- त्यामधून देशात पिनकोड असलेल्या १९ हजार ठिकाणी डिलिव्हरी देणे शक्य आहे.
- भागीदारीमुळे स्पाईसजेटची क्षमता वाढणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
- या भागीदारीतून ओम लॉजिस्टिक्स ही स्पाईसजेटल शीतकरणाची सुविधा असेलल्या ट्रक पुरविणार आहे.
- तर स्पाईसजेटकडून देशभरासह विदेशात कमी तापमानामध्ये लसीची हवाई वाहतूक करण्यासाठी सेवा देण्यात येणार आहे.