नवी दिल्ली - भाजपने 'मै भी चौकीदार' अशी प्रचार मोहिम सुरू केल्यानंतर सुरक्षा रक्षकांची सेवाही चर्चेत आली आहे. अशातच केंद्रीय खासगी सुरक्षा उद्योग संघटनेने (सीएपीएसआय) राष्ट्रीय गुणवत्ता परिषदेबरोबर करार केला आहे. हा करार खासगी सुरक्षा कंपन्यांचे प्रमाणीकरण आणि मानांकन करण्यासाठी करण्यात आला आहे. यामुळे सुरक्षा रक्षकांना अधिक रोजगार देणे आणि त्यांची विश्वसनीयता वाढविणे शक्य होणार आहे.
सीएपीएसआय ही सुरक्षा रक्षकांची सर्वोच्च संस्था आहे. नव्या करारानुसार खासगी सुरक्षा रक्षकांसाठी तांत्रिक निकष ठरविण्यात येणार आहेत. त्यानंतर तृतीय पक्षाकडून त्याचे मुल्याकंन करण्यात येणार आहे. एमएससी, क्युसीएल आणि सीएपीएसआय, अशा संस्थांना नॅशनल अॅक्रिडिशन बोर्ड फॉर सर्टिफिकेशन बॉडिजची मान्यता आहे. ही संस्था जागतिक मानाकंन आणि पात्रतेप्रमाणे निकष तयार करण्याचे काम करते.
सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या कंपन्यांच्या दर्जाचे होणार मानांकन - MSC
खासगी सुरक्षा कंपन्यांमध्ये ८५ लाखांहून अधिक सुरक्षा रक्षक आहेत. हे देशामध्ये सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र आहे. तर देशात २२ हजारांहून अधिक सुरक्षा कंपन्या आहेत.
संग्रहित - सुरक्षा रक्षक
खासगी सुरक्षा कंपन्यांमध्ये ८५ लाखांहून अधिक सुरक्षा रक्षक आहेत. हे देशामध्ये सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र आहे. तर देशात २२ हजारांहून अधिक सुरक्षा कंपन्या आहेत. खासगी सुरक्षा रक्षक कंपन्यांचे मुल्यांकन आजपर्यंत होत नव्हते. मात्र मुल्यांकन केल्यानंतर त्यांना काम देणे सहजशक्य होणार असल्याचे सीएपीएसआयचे चेअरमन कुंवर विक्रम सिंग यांनी सांगितले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम.एन.रॉय यांची चेअरमन म्हणून संस्थेवर निवड केल्याचेही त्यांनी सांगितले.