सॅनफ्रान्सिस्को - सोनीकडून हेडसेटसाठी नव्या पिढीतील तंत्रज्ञान असलेल्या व्हर्च्युल रियॅल्टीवर (व्हीआर) काम करण्यात येत आहे. त्यामधून रिझॉल्यूशन आणि सिंगल कॉर्डही ऐकता येऊ शकेल अशा तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या हेडसेटचे पीएस ५ हे नाव आहे.
सोनीच्या प्लेस्टेशन प्लॅटफॉर्म आणि प्लॅनिंगचे प्रमुख हिडेकी निशिनो म्हणाले की, आम्ही जेव्हापासून पीएस व्हीआर, पीएस४ च्या लाँचिंगपासून शिकत आहोत. नव्या पिढीतील व्हर्च्युल रियॅल्टीच्या व्यवस्थेत रिझोल्यूशनमध्ये सुधारणा करत आहोत. त्यामधून पीएस५ हा सिंगल कॉर्डलाही जोडला जाऊ शकतो. ऐकण्याचा चांगला अनुभव घेऊ शकतो, असेही निशिनो यांनी सांगितले. सोनीकडून नवीन व्हिआर नियंत्रकावर काम करण्यात येत आहे. त्याचा उपयोग हा ड्यूलसेन्स पीएस ५ नियंत्रकामध्ये करण्यात येतो. व्हीआर नियंत्रकांमध्ये एरगॉनॉमिक्समध्ये सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येते.
हेही वाचा-ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे भांडवलीकरण करण्याची गरज-शक्तिकांत दास