महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 21, 2019, 3:09 PM IST

Updated : Aug 21, 2019, 3:58 PM IST

ETV Bharat / business

'सच्ची शक्तीभरे' म्हणणाऱ्या 'पारले'ला मंदीचा फटका; १० हजार कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ?

ग्रामीण भागात मंदीचा फटका बसल्याने एफएमसीजी क्षेत्राला फटका बसत आहे. यामध्ये पारले कंपनीला फटका बसत आहे.

पारले

मुंबई - 'सच्ची शक्तीभरे' असे ब्रीदवाक्य असलेल्या पारले बिस्कीट कंपनीला मंदीचा फटका बसत आहे. त्यामुळे कंपनी १० हजार जणांना कामावरून कमी करणार असल्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागात मंदीचा फटका बसल्याने एफएमसीजी क्षेत्राला फटका बसत आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर आणि नेस्टलेच्या उत्पादनांची विक्री कमी झाली आहे.


पारले प्रोडक्ट्सचे कॅटगरी हेड मयांक शाह म्हणाले, जीएसटीत सवलत मिळाली नाही तर कंपनी किमान ८ हजार ते १० हजार जणांना कामावरून कमी करू शकते. ग्रामीण भागाचा कंपनीच्या बाजारपेठेत एक तृतीयांश हिस्सा आहे. कृषी क्षेत्राला मदत केली तर एफएमसीजी उद्योगावर सकारात्मक परिणाम होवू शकतो.

हिंदुस्थान लिव्हरच्या उत्पादनांची जून तिमाहीदरम्यान मोठ्या प्रमाणात विक्री कमी झाली आहे. मॅग्गी नुडल्स आणि कॉफीची निर्मिती करणाऱ्या नेस्ले इंडियाने म्हटले, आमच्या उत्पादनांनी चांगली कामगिरी केल्याचा अभिमान आहे. असे असले तरी कमी मागणी आणि वस्तुंच्या वाढत्या किमतीच्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.

Last Updated : Aug 21, 2019, 3:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details